Home गोंदिया जिल्हा नालीचे अर्धवट बांधकाम

नालीचे अर्धवट बांधकाम

43
0
Oplus_131072


गोंदिया : शहरात विकासकामाच्या नावावर मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला लागून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र सदर नालीचे बांधकाम अर्धवट ठेवून कामबंद करण्यात आले. या बाबीला तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटला असून नाली अपूर्णच आहे. या प्रकाराकडे पालिका दुर्लक्ष करीत असून कंत्राटदाराला अभय दिले जात आहे.
विकासकामाच्या नावावर शहर भकास करण्याचे काम सुरू आहे. असाच प्रकार येथील जिल्हा न्यायालय परिसरात दिसून येत आहे. सांडपाणी निकासीसाठी जवळपास तीन ते चार महिन्यापूर्वी जिल्हा न्यायालय इमारत जवळून नाली बांधकामाला सुरूवात करण्यात आली. नालीचे बांधकामही सुरू झाले. यासाठी खोदकाम करण्यात आले. दरम्यान कंत्राटदाराने एका बाजुने नाली बांधकामास सुरू केली. परंतु, नालीचे काम पूर्ण न करताच अधर्वट स्थितीत काम सोडून कंत्राटदार बेपत्ता झाला आहे. केलेले खोदकाम जैसे थेच्या स्थितीत पडून आहे. या प्रकारामुळे संबधित कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. असे असले तरी पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच शहरात विकासाच्या नावावर मनमर्जीपणा सुरू असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.