Home Uncategorized मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

31
0

 • 17 मे पर्यंत अर्ज मागविले

     गोंदिया, दि.17 : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन 2025-26 घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी शर्ती सविस्तर माहितीसाठी विभागाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 17 मे 2025 सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोष्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स समतानगर, येरवडा, पुणे-411006 येथे दोन प्रतीत सादर करण्यात यावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी केले आहे.