नागरिकांनी अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील “नागरी आरोग्य वर्धिनी “केंद्रात जावुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा
-लायकरामजी भेंडारकर,अध्यक्ष, जि.प.गोंदिया
दि.10 मे रोजी रात्री 9.30 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर पोहचले थेट अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात.भेटी प्रसंगी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत देत असलेल्या आरोग्य सेवाची पाहणी करुन जनसामान्य,गोरगरीब,शेतमजुर व मोलमजुरी करणार्या नागरिकांना गुणवत्तापुर्वक सेवा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी व कार्यरत कर्मचार्यांना दिले.आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांचे मोबाईल क्रमांक याची नोंद ठेवुन फालोअप ठेवण्याचे सुचित केले.ह्या वेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ.अजिंक्य आंबेडारे,आरोग्य सेवक नेपाल नारनवरे,स्टाफ नर्स कल्याणी मंडरेले,परिचर हशीला वैद्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे.शहरी भागातील जनसामान्य,गोरगरीब,झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र “15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापित केले आहे.
शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे,काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत होते.तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी,सातत्यपूर्ण,आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी,विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी,तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र“च्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येत आहे.
“नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र“येथे खालील प्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
1) बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी 2.00 ते रात्री 10.00)
2) मोफत औषधोपचार
3) मोफत तपासणी व प्राथमिक उपचार
4) टेली कन्सल्टेशन
5) गर्भवती मातांची तपासणी
6) लसीकरण
7) बाह्य यंत्रणेद्वारे (एच.एल.एल.कंपनी मार्फत) रक्त तपासणीची सोय
नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,बहुउद्देशीय कर्मचारी,अटेंडंट/गार्ड आणि सफाई कर्मचारी ई.चा मनुष्यबळाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील जंगलव्याप्त,अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांनीनागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात लोकांनी प्राथमिक उपचार व मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी अर्जुनी मोरगाव वासियांना केले आहे.

