Home गोंदिया जिल्हा २ महिन्यातच शोष खंड्ड्यांची लागली वाट

२ महिन्यातच शोष खंड्ड्यांची लागली वाट

57
0
Oplus_131072


ग्रा.पं. तुमसर येथील प्रकार
गोरेगाव
: घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून तुमसर येथे बोअरवेलजवळ शोष खड्डे तयार करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे शोष खड्डे असल्यामुळे अवघ्या दोन महिन्यातच त्यांची वाट लागली आहे. यामुळे तुमसर गावात झालेल्या भ्रष्टाचाराला घेवून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाकडून कंत्राटदाराची पाठराखण करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सांड पाण्याची सुव्यवस्थित व्यवस्थापन व्हावे यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत तुमसर ग्रामपंचायतीच्या वतीने कंत्राटदाराच्या माध्यमातून बोअरवेल जवळ शोष खड्डे तयार करण्यात आले. मात्र काँक्रिटने तयार करण्यात आलेल्या शोष खड्ड्यांची अवघ्या दोन महिन्यातच वाट लागली आहे. शोष खड्ड्यांचे झानक व भिंती तुटल्याने पाणी पुन्हा रस्त्यावर वाहू लागले आहे. या प्रकारामुळे गावात ग्रा.पं. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.