Home गोंदिया जिल्हा स्व.प्रा.श्याम ठवरे यांचे चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आदिवासी समुह नृत्य स्पर्धा व समाज प्रबोधन...

स्व.प्रा.श्याम ठवरे यांचे चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आदिवासी समुह नृत्य स्पर्धा व समाज प्रबोधन मेळावा

99
0

उपस्थित राहण्याचे आवाहन
नवेगावबांध : जवळील ग्राम धाबेटेकडी पवनी येथे स्व.शाम ठवरे युवा फाउंडेशन व मित्र परिवारद्वारे उद्या (ता.२१) भव्य आदिवासी समूह नृत्य स्पर्धा आणि आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त राष्ट्रीय प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन पर किर्तन २१ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे.
२२ व २३ एप्रिल रोजी भव्य आदिवासी समुह नृत्य स्पर्धा आणि आदिवासी समाज प्रबोधन मेळावा आयोजित आहे. आदिवासी व बहुजन समाजातील तरुण-तरुणी बालगोपाल यांच्यातील सुप्त गुणांना चालना देऊन संस्कृतीचे दर्शन घडविण्याच्या हेतूने भव्य आदिवासी समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर दादा रक्षक प्रवर्तक श्री गुरुदेव युवा मंच नागपूर, मुकेश दादा पेंदाम, तानेस ताराम, ईश्वर शिवाजी, अनिल दहिवले, योगेश कापगते, नारायण डोंगरवार, गोवर्धन संयाम उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवशाहीर रामानंद उगले यांचा दिमागदार कार्यक्रम सादर होणार आहे. भव्य आदिवासी समूह नृत्य स्पर्धा, ६२ हजार रुपयांचे रोख बक्षीस स्व.प्रा.तथा वारिष्ट पत्रकार शाम ठवरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त भव्य आदिवासी समुह स्पर्धा ता.२२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता पासून आयोजित करण्यात आलेली आहे या नृत्य स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक १७००१ रुपये द्वितीय १५००१ रुपये तृतीय १३००१ रुपये चतुर्थ १०,००१ रुपये तर पाचवं बक्षीस ७००१ रुपये अशा रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सदर आयोजित भव्य आदिवासी समुह नृत्य स्पर्धा आणि आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक डॉ.राहुल ठवरे, मुख्य संरक्षक स्व.प्रा.शाम ठवरे युवा फाउंडेशन पवनी धाबे व मित्रपरिवार तसेच बिरसा ब्रिगेड समिती रामपुरी, येलोडी, जामडी, पवनी, झाशीनगर, बसबोळन, तिडका, येरंडी, जब्बारखेडा, धाबेटेकडी, कानोली रांजीटोला, कोहलगाव, परसोडी, पांढरवाणी, चान्ना, खोली येथील मित्र मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.