पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राविण्यप्राप्त विद्यार्थाना प्रमाणपत्र वितरण
- पत्रकारांचा भव्य सत्कार व स्नेहमिलन
- गोंदिया- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत संचालित आजीवन अध्ययन व विस्तार विभाग द्वारा मान्यता प्राप्त एन.एम.डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग द्वारे पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2022-23 पासून सुरू करण्यात आले प्रथम बँच चे विद्यार्थाचा निरोप समारंभ 4 में रोजी संपन्न झाले असून एन.एम.डी काँलेज मधून 60 विद्यार्थी शिक्षण घेवून झाले पत्रकार
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयांचे प्राचार्य डाँ.शारदा महाजन होते तर प्रमुख उपस्थित
संजय राऊत, दैनिक लोकसत्ता,
कैलाश गजभिये ,उपसंपादक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय गोंदिया,
हरिष मोटघरे,जी.बी.वृत्तवाहिनी,
जयंतजी शुक्ला, दैनिक लोकशाही वार्ता जिल्हा प्रतिनिधी, अपूर्व मेठी, दैनिक हितवाद जिल्हा प्रतिनिधी,
आकाश वालदे, न्युज मराठी,
रवी सपाटे, न्युज 18 लोकमत,
देवेंद्र रहांगडाले,ABP माझा,
अमित गुप्ता,जी.बी.न्युज,
नवीन दहीकर, टाईम्स नाऊ,
सावन डोये, दैनिक नवराष्ट्र मराठी,
मुनेश्वर कुकडे,दैनिक सकाळ जिल्हा प्रतिनिधी, संजीव बापट,दैनिक जनप्रेरणा, महेंद्र लिल्हारे, न्युज प्रभात आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणातून अभ्यासक्रम सन्मयक प्रा. डाँ. बबन मेश्राम यांनी सांगितले कि,सदर अभ्यासक्रम महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध विभागातिल विद्यार्थ्यांसाठी संस्था सचिव माजी आमदार राजेंद्र जैन,युवा संचालक निखिल जैन,प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर विषयाचे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे याकरीता तसेच येणाऱ्या नविन शैक्षणिक धोरण लक्षात घेवून पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला . पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची (सर्टिफिकेट इन जर्नलिझम)किमान बारावी उत्तीर्ण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. दर शनिवार व रविवारी एन.एम.डी कॉलेज येथे पत्रकारितेचे धडे दिले जातात. विद्यापीठ मान्यताप्राप्त असून शासनमान्य अभ्यासक्रम असल्याने सरकारी तसेच खासगी नोकरीसाठी अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाते. पुढिल सत्रात. ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’सह इतर व्यवसायीक अभ्यासक्रमही कॉलेजात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित प्रिंटमिडीया व इलेक्ट्रानिक मिडिया तसेच शोसल मिडिया पत्रकार व भावी पत्रकार यांचा स्नेहमेळाव्यात पत्रकाराचा महाविद्यालयाचे वतिने सन्मानचिन्ह देवून भव्य सत्कार करुन गौरविण्यात आले तर अभ्यासक्रमातिल प्राविण्यप्राप्त विद्यार्थाना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पत्रकार हे समाजातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी अविरत कार्य करतात. पत्रकार यांच्यामुळे अनेक बाबी व पैलू ह्या सकारात्मक केल्या जातात. सर्व क्षेत्राचा आढावा आणि अनुभव घेऊन बातमी तयार करावी. समाजाला व देशाला यांनी सतत तत्परतेने जागृत करण्याचे काम केले आहे. लोकशाहीचे चौथ्या स्तंभ म्हणून लोकशाहीला जीवंत ठेवून समाजाला सजग करतात. असे प्रतिपादन न.मा.द महाविद्यालय गोदिंयाचे प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले आहे. त्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून सर्व मान्यवरांनी अभिवादन करण्यात आले. मंचावरील सर्व पाहुण्यांचे सन्मान चिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आले. त्याबरोबर मागील सत्र २०२२-२३ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पत्रकारिता क्षेत्राबद्दल मनोगत व्यक्त करताना मुन्नाभाई नंदागवळी, कृतीका कनोजिया, मिथीलेस मेहर व गजाला शेख यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपापले अनुभव सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डा.बबन मेश्राम यांनी मांडले तसेच सूत्रसंचालन प्रदीप ढवळे यांनी केले तर आभार हिना लांजेवार हिने मानले. तर यशस्वीतेसाठी इशा सातभावे, मुन्नाभाई नंदागवळी, प्रणाली बंसोड, स्नेहा डोंगरे, प्राची बरोले, आर्या चव्हाण, सोनल यादव, राधिका मेंढे, ओम पारमार, देवेंद्र दमाहे, सौरभ ठाकरे, नरेश बोपचे, मनीष ठाकरे, विनय मेंढे, प्रफुल उके,आयुष उपरीकर, निकिता उके, हर्षु बावनकर,सुहानी ठाकरे,कृतिका कनोजिया, शारदा नागरिकर,रवींद्र कावळे,सुशील गौतम,,मनीष दहिकर उमेश बनसोड, शुभम बोरकर,सायली ठाकूर,पल्लवी पटले, सचिन बनसोड,सोनाल यादव यांनी परिश्रम घेतले.
पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राविण्यप्राप्त विद्यार्थि
निखिल बन्सोड ,अजित रहांडाले, अंकेश रामटेके, शिवानी हाडगे ,रत्नदीप कांबळे ,ओम परमार ,गजाला शेख ,भूमेश्वर खोब्रागडे मिथिलेश मेहर ,शिवम बहेलिया, हर्ष वेगड, अनुप हरिणखेडे, वैशाली हलमारे, अंचल पटले, निकिता वासनिक, पल्लवी शहारे, प्रणाली मेश्राम, ममता नाईक, प्रतीक्षा बोरकर, रामसिंग बघेले, प्रज्वल चौरे, सतीश पाचे, पुनम वाघाडे, कार्तिक हेमने, ज्ञानेश्वरी सुलाखे, श्रध्दा जयस्वाल, ग्यानेश्वरी सुलाखे, मोसम बिसेन, प्राची कटरे,रत्नदिप कांबडे, ज्योती चंर्दोल, लावण्या बनोते, सह आदि विद्यार्थी यांनी उत्तीर्ण होवून प्राविण्यप्राप्त केले.

