गोंदिया : आज गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने खासदार प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशानुसार, माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनात महावितरण व्दारा लादण्यात येत असलेल्या अतिरिक्त विज भार कमी करण्याबाबतचे निवेदन मुख्य अभियंता, म.रा. वि. वि विभाग गोंदिया यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाव्दारे वीज ग्राहकांकडून विविध प्रकारचे अतिरिक्त भार (शुल्क) च्या रूपात वसूल केल्या जाते. त्यात GST कर लावून पुन्हा ग्राहकांवर आर्थिक बोजा लादण्याचे काम विद्युत मंडळ करीत आहे. 100, 200, 300 याप्रमाणे पर 100 युनिट च्या पलीकडे अतिरिक्त शुल्क लावून ग्राहकांचा शोषण होत आहे यात सरासरी एकाच दराने विद्युत आकारणी करावी. शहर व ग्रामीण भागात अनियमित पुरवठा होत असलेली वीज नियमित करावी. मान्सुन पूर्व विद्युत व्यवस्था करून विद्युत तारांमुळे होणारी जीवित हानी टाळावी यासह अनेक मागण्याचे निवेदन पक्षा च्या वतीने देण्यात आले. राज्य विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराला जनता त्रस्त झाली असून विज ग्राहकाला आर्थिक भुर्दंड लागू नये याकरिता अतिरिक्त भार, GST कर कमी करण्यात येवून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा व योग्य अंबलबजावणी करण्यात यावी या संबंधीचे निवेदन गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्य अभियंता, म.रा.वि.वि.विभाग गोंदिया यांना देण्यात आले. यावेळी नानू मुदलियार, आनंद ठाकूर, खालिद पठाण, राजू भगत, संजय सोनुने, झनकलाल ढेकवार, विजेंद्र जैन, टी. एम. धुवारे, तरंग जायसवाल, अनुज जायसवाल, राजेश वर्मा, तुषार उके, शरभ मिश्रा, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे यांच्या सह कार्यकर्ता उपस्थित होते.
Home Uncategorized शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्युत मंडळाला वीजदर कमी करण्याचे निवेदन

