गोंदिया : गोरेगाव येथे चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गोंदिया येथील धनंजय रामलाल खोब्रागडे (वय 60) यांच्या गोरेगाव येथील शेतातील फार्म हाऊस मधून त्यांच्या मालकीची 0.38 हेक्टर शेतीतून 1 लाख 40 हजार किमतीचे सहा सोलर पॅनल चोरट्याने चोरून नेले. ही घटना 14 मे रोजी घडली असून पहाटेच्या वेळेस दोन इसम यांच्याकडून सदर पॅनल काढून घेऊन जाताना फार्म हाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे शेतात सोलर पॅनल लावलेले इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी धनंजय खोब्रागडे यांनी केली आहे.
