Home Uncategorized धम्म परिषद व ‘अहिंसक अंगुलीमाल’ महानाट्य 26 रोजी

धम्म परिषद व ‘अहिंसक अंगुलीमाल’ महानाट्य 26 रोजी

117
0

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून 26 मे रोजी हेलीपॅड ग्राउंड नवेगावबांध येथे सायंकाळी 4 वाजता बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 7 वाजता ‘अहिंसक अंगुलीमाल’ या महानाट्याचे प्रयोग सादर करण्यात येणार आहे. धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ. भदंत ज्ञानदीप महास्थवीर बौधगया यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य समता सैनिक दलाचे राष्ट्रीय स्टाफ ऑफिसर गजेंद्र गजभिये राहणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता या धम्म परिषदेला प्रामुख्याने पूज्य भिक्खू संघाचे डॉ. भदंत धम्मदीप महास्थवीर, खेम धम्म भंते, डॉ. भदंत सुमनपाल महास्थवीर मिझोरम, भदंत धम्म धातू, भिक्षुनी धम्मसीला, तिबेटियन श्रामनेर-गेलु गुरु, पसंग लामा मोठा, थे छोक, पेनवा, रांग डोले, छोदक, छजोर, केदित, कुंगा, धोया, पंजाब, गेसला गुरु यांचे धम्म परिषदेला प्रामुख्याने मार्गदर्शन लाभणार असून मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांना होणार आहे. धम्म परिषदेनंतर सायंकाळी 7 वाजता 40 कलावंतांचे समावेश असलेले अहिंसक अंगुलीमाल महानाट्य सादर करण्यात येणार आहे. महानाट्यचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम, उपअभियंता आर. एस. टेंभुर्णीकर, जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जि. प. सदस्य रचना गहाणे, लायकराम भेंडारकर, पं.स. उपसभापती होमराज पुस्तोडे, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, डॉ. अविनाश काशीवार, केवल बघेले, महिला अध्यक्ष सुशीला हलमारे, रजनी गिरेपुंजे, कल्पना बहेकार,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोने, सरपंच हिराताई पंधरे, उपसरपंच रमण डोंगरवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेला तसेच अहिंसक अंगुलीमाल महानाट्याच्या प्रयोगाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.