Home Uncategorized अखेर ढाकणी-फत्तेपूर रस्ता झाला गुळगुळीत

अखेर ढाकणी-फत्तेपूर रस्ता झाला गुळगुळीत

195
0

११ किमीची पायपीट थांबली

गोंदिया : ढाकणी ते फत्तेपूर हा ३ किमीचा रस्ता अत्यंत जर्जर आणि दुरवस्थेला आला होता. यामुळे या रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिक करीत होते. रस्ता दुरवस्थेला आल्याने परिसरातील गावातील नागरिकांना ३ किमीचे अंतर कापण्यासाठी ११ किमीची पायपीट करावी लागत होती. अखेर या रस्त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ता धनंजय रिनायत यानी पुढाकार घेत दोन्ही आमदारांशी समन्वय साधला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ढाकणी-फत्तेपूर रस्ताचे काम पूर्ण झाले. त्यामुळे कित्येक वर्षांपासून सुरू असलेली नागरिकांची पायपीट थांबली आहे.गोंदिया शहराला लागून असलेला ढाकणी ते फत्तेपूर हा रस्ता गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाचा आहे. सतत या मार्गावर वर्दळ राहत असल्याने रस्ता जर्जर होऊन दुरवस्थेला आला होता. रस्ता खड्डेमय झाल्याने रहदारी करणे कठीण झाले होते. यामुळे परिसरातील ओझाटोला, खर्रा, फत्तेपूर या गावातील नागरिकांना गोंदिया येथे ये-जा करणे डोकेदुखीचे ठरत होते. गोंदियापर्यंतचे ३ किमीचे अंतर कापण्यासाठी नागरिकांना ७ किमी ते ११ किमीचा पल्ला गाठावा लागत होता. ही समस्या लक्षात घेत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ता धनंजय रिनायत यांनी पुढाकार घेतला. तिरोडा व गोंदिया या दोन्ही विधानसभा क्षेत्रात सदर रस्ता येत असल्याने रिनायत यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल व तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले या दोघांशी पाठपुरावा केला. दोन्ही आमदारांमध्ये समन्वयक साधून सदर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान १५ दिवसात या समस्येवर सकारात्मक मार्ग काढत दोन्ही आमदारांच्या पुढाकारातून ३ किमी रस्त्यासाठी २.१७.२९ लक्ष रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला. दरम्यान रस्ता बांधकामाला सुरूवात करून काम पूर्णत्वास नेण्यात आले. यामुळे ढाकणी-फत्तेपूर डांबरीकरण रस्ता गुळगुळीत झाला असून नागरिकांची पायपीट थांबली आहे. गोंदिया गाठणे सहज शक्य झाल्याने गावकर्‍यांसह धनंजय रिनायत यांनी आ.विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले व धनंजय रिनायत यांचे आभार मानले आहे.