Home Uncategorized विद्यार्थ्यांनी घेतला उन्हाळी शिबिराचा लाभ

विद्यार्थ्यांनी घेतला उन्हाळी शिबिराचा लाभ

51
0

अदानी फाउंडेशनचा उपक्रम 

गोंदिया : तिरोडा अदानी फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळा गुमाधावडा येथील इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरीता अदानी फाउंडेशन प्रमुख बिमुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला सरपंच पद्मा कंगाली, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील श्रीपात्री, अदानी फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी राहुल शेजव, शाळेचे मुख्याध्यापक संतोष पारधी, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकरीता कथाकथन, पेपर क्राफ्ट,  सायन्स विथ फन, अग्निसुरक्षा, चित्रकला, पेपर बॅग बनविणे, ग्रीटिंग कार्ड, आरोग्य विषयक मार्गदर्शन यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन लोकेश चौरावर, गिरीश कुलकर्णी, निखिलेश गोळे, डॉ. करिष्मा लांजे यांच्यासारख्या तज्ञ साधन व्यक्तींच्या माध्यमातून करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पारधी व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.