आमदारांच्या प्रयत्नामुळे ई-लायब्ररीसाठी 2.50 कोटी मंजूर : तालुक्यातील कामठा, रावणवाड़ी, आसोली, पांढराबोडी, काटी गावात होणार निर्माण
गोंदिया : आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून ई-लायब्ररी (वाचन कक्ष) साठी 2.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मुख्य मध्यवर्ती असलेले कामठा, रावणवाड़ी, आसोली, पांढराबोडी, काटी गावांमध्ये ही वाचनालये बांधण्यात येणार असून हे वाचनालय आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनी सुसज्ज असणार आहे. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हे वाचनालय फायदेशीर ठरणार असून विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातून शहरापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रवासात बराच वेळ जातो आणि त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, मात्र आमदार विनोद अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आता स्पर्धा परीक्षार्थींना त्यांच्या स्वत:च्या अत्याधुनिक ई-लायब्ररीची सुविधा उपलब्ध झाली आहे. बांधकाम केल्यानंतर उपलब्ध होईल.आमदार विनोद अग्रवाल हे नेहमीच प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक समाजासाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकरी आणि वृद्धांसाठी काम करतात. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत 100 टक्के विकास झाला असे म्हणता येणार नाही, असे ते नेहमी सांगतात. आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना अनेक प्रकल्प राबवले, त्यापैकी गावची शाळा, आमची शाळा, हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबविला गेला. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी JEE, NEET MH-CET च्या स्पर्धा परीक्षांसाठी क्रॅश कोर्सचे ऑनलाइन वर्ग मोफत उपलब्ध करून दिले होते. परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांच्याकडून आमदार निधीतून मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे ग्रामीण भागातील व परिसरातील खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी मिळाली. याशिवाय ते वेळोवेळी तरुणांसाठी करिअर मार्गदर्शनासारखे अनेक कार्यक्रम आयोजित करतात. ई-लायब्ररीला मान्यता मिळाल्याबद्दल परिसरातील तरुणांनी आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.

