गोंदिया : स्थानिक शास्त्री वॉर्ड येथील सिध्द हनुमान महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीने शितला माता मुर्ती प्राण प्रतिष्ठा व हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन २२ ते २४ एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता शोभायात्रा कलश व ध्वजारोहणाचे करण्यात येणार आहे. यानंतर गजानन मंदिर दर्शन, प्रायश्चित संकल्प, गौ-पुजन, गणेश गौरी कलश पुजन, पुण्याह वाचन, वास्तु मंडप प्रसाद त्रिसुन्न करण व जलाधिवास कार्यक्रम आयोजित आहेत. २३ एप्रिल रोजी सकाळी वाजतापासून सुर्य पुजन, अग्नीस्थापना, श्री सुक्त रूद्रसुक्त हवन व हनुमान जन्मोत्सव, अभिषेक, शृंगार व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० से ९ वाजता दरम्यान निव्य पुजन प्राण प्रतिष्ठा, महाअभिषेक व भगवान शृंगार, सायंकाळी ४ त ६ वाजता दरम्यान पुर्णाआहुती व कन्या भोजन तर रात्री ८ ते ११ वाजता दरम्यान महाप्रसाद वितरण, शिखरी पुजा होणार आहे. अनुष्ठान, पुजन, यज्ञकर्म आचार्य मानस सत्पथी व त्यांच्या शिष्यांच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिध्द हनुमान मंदिर सेवा समिती शास्त्री वॉर्डच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.




