मिरवणूक काढून दिला ‘जियो और जिने दो’चा संदेश
देवरी : शहरातील जैन बांधवांनी रविवारी (दि.२१) महावीर जयंती उत्साहात साजरी केली. यानिमित्त सर्वांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पूजाअर्चना, शांतिधारा, ध्वजपताका चढविण्यात आली. ध्वजपताका व शांतीधाराचा मान भरत पाटणी परिवाराला मिळाला व पूजाअर्चना करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जैन बांधवांनी ‘जियो और जीने दो’च्या घोषणा दिल्या. जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. जैन मंदिरापासून निघालेली मिरवणूक बाजार लाइन, पंचशील चौक, गणेश चौकमार्गे जैन मंदिरात आली प्रसाद वितरित करण्यात आला. महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जैन समाजाचे अध्यक्ष महेश जैन, नरेंद्र पांड्या अशोक जैन, नरेंद्र जैन, विनोद जैन, दिनेश जैन, गिरीश जैन, वैभव जैन, सुशील जैन, भरत पाटणी, विभोर जैन, श्रेय पांड्या, रोहित विनायके, तसेच सर्व समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.




