Home Uncategorized आदिवासी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणाकडे लक्ष द्यावे : आ. चंद्रिकापुरे

आदिवासी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणाकडे लक्ष द्यावे : आ. चंद्रिकापुरे

67
0

सडक अर्जुनी, (गोंदिया) : जल, जंगल आणि जमीन वाचवून ठेवण्याचे काम आदिवासी समाज बांधवांनी केले आहे. मात्र, या देशातील आदिवासी समाज हा अजूनही शिक्षणाच्या क्षेत्रात मागेच राहिलेला आहे. त्यामुळे या समाजाची प्रगती झाल्याचे पहावयास मिळत नाही. परंतु समाजामध्ये जर चित्र बदलवायचे असेल या समाजातून विविध विभागात काम करणारे मोठे अधिकारी घडले पाहिजेत. यासाठी आदिवासी समाजातील मुलांनी शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. सडक अर्जुनी येथे जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना तेजस्विनी लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंडवाना गोंड समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत मडावी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले, राज्य संघटनेचे सचिव मिलिंद फुरसुंगें, डॉ. अजय लांजेवार, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, माजी सभापती प्रकाश बापू मडावी, प्राचार्या रिता लांजेवार, नगरसेविका कामीनी कोवे, नगरसेवक, प्राचार्य राजकुमार हेडावू , भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, माजी प स सदस्य सुधाकर पंधरे, छाया टेकाम, सुभांगी वाढवे, मधुकर गावराणे, सरपंच लता गहाणे, प्रल्हाद वरठे, लेखलाल टेकाम, श्रावण भोयर, पत्रकार सुशिल लाडे, संजय प्रधान, डेव्हिड सयाम, लता कुंभरे आदी उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नगरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी आदिवासी समाजातील ज्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, तर इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. या नृत्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. विज्ञानावर आधारित प्रयोग शासकीय आश्रम शाळा शेंडा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेत. इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी खुशी प्रधान हिने उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल आमदार चंद्रिकापुरे व इतर मान्यवरानी तिचा गुण गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन मधुकर टेकाम यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव व इतर नागरिक उपस्थित होते.