देवरी, (गोंदिया) : दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण येथील जय श्रीराम समुहाच्या वतीने श्रावण मास निमीत्त 11 ऑगस्ट रविवारला देवरी येथे भव्यदिव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी 7 वाजता नगर पंचायत जवळील शिव मंदिरात सर्व शिवभक्त एकत्र आल्यानंतर वडेगांव येथील महादेव घाट साठी प्रस्थान करतील. महादेव घाट येथील गंगा जल घेऊन कावड यात्रेला देवरीसाठी परत प्रवास सुरु होईल. देवरी येथील अग्रसेन चौकात आगमन झाल्यानंतर कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येईल. त्यानंतर कावड यात्रा देवरी नगरातील राणी दुर्गावती चौक, चिचगड रोड, बौद्ध विहार, मस्क-या चौक, पंचशील चौक, कारगील चौक, दुर्गा चौक भ्रमण करुन परत शिव मंदिरात आरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कावड यात्रेत शिव भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
