देवरी : देशात विविध धर्माचे, पंथाचे, विविध समाजाचे नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी या सर्वांना मिळून एक देश उभा आहे. परंतू या सर्वांच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि देशाला पोषक असा वातावरण तयार करण्यासाठी पत्रकारांची कलम व भूमिका ही देश हितासाठी खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन उपसभापती अनिल बिसेन यांनी केले. ते देवरी तालुका पत्रकार संघाचा स्वनिर्मित जिल्ह्यातील एकमेव असलेला असा पत्रकार भवनाचा उदघाटन सोहळा आणि सोबतच माजी आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत तालुक्यातील सर्व भाषिक इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर अतिथी म्हणून भाजपचे भंडारा – गोंदिया जिल्हा समन्वयक वीरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, जि. प. सदस्य संदिप भाटीया, पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार, गटविकास अधिकारी सिंगनजुडे, नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, नगरसेवक संजय दरवडे, रितेश अग्रवाल, नूतन कोवे, पिंकी कटकवार, कमल मेश्राम, तनूजा भेलावे, हिना टेंभरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंशुल अग्रवाल, प्राचार्य मनोज भुरे, जी. एम. मेश्राम, जितेंद्र रहांगडाले, अश्मित पिल्लई, देवरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, संस्थापक अध्यक्ष फाविंद्र हाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष चंचल जैन, उपाध्यक्ष जुबीन खान, सुरेश साखरे, सचिव सुरेश चन्ने, सहसचिव सुरेश भदाडे, कोषाध्यक्ष सुनील चोपकर, प्रसिद्धी प्रमुख नंदूप्रसाद शर्मा, सहप्रमुख संजय तरोणे, संघटक सदस्य महेंद्र मेश्राम, देवेंद्र सेलोकर, संजय मलेवार आणि शाहीद पठाण आदींनी सहकार्य केले.

