गोंदिया : दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी महेंद्र बिसेन यांचे वडिल सेवानिवृत्त शिक्षक शोभेलाल कोदूराम बिसेन यांचे आज (ता.३) सायंकाळी ७.३० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षाचे होते. सेजगाव येथील मुळचे रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक शोभेलाल बिसेन यांनी तिरोडा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तुमसर या तालुक्यातील अनेक शाळांमध्ये सेवा दिली. मृत्यू पश्चात त्यांच्या मागे तीन मुले, सुन, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता गोंदिया/सुर्याटोला येथील महेंद्र बिसेन यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

