Home Uncategorized चांगल्याला विरोध करणे विरोधकांचे काम : शिवानी दाणी

चांगल्याला विरोध करणे विरोधकांचे काम : शिवानी दाणी

102
0

पत्रकार परिषदेत दिली अर्थसंकल्पाची माहिती

गोंदिया : जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून नकारत्मकता पसरविण्याच्या विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा उघड झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला खूप काही मिळाले असताना आणि भरघोस निधीचा थांगपत्ताच विरोधकांना न लागल्यामुळे त्यांनी केलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चोख उत्तर दिले असून विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयीचे अज्ञान उघड झाले आहे. चांगल्याला विरोध करणे विरोधकांचे काम असल्याचे भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी म्हणाल्या. त्या येथील राईस मिल असोसिएशनच्या सभागृहात 1 ऑगष्ट रोजी प्रबुद्ध नागरिक संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी आल्या असता माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होत्या. दाणी पुढे म्हणाल्या, आपल्याला अर्थसंकल्पातले काही कळत नाही, अशी जाहीर कबुली मु‘यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांचे हे अज्ञान आता उघड झाले असून अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मागणी केल्यास या पुस्तकाच्या प्रती त्यांना मोफत वितरित करण्यात येतील. अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 600 कोटी रुपयांची तरतूद, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी 400 कोटीची तरतूद, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, हरयाणा, उत्तरप्रदेश राज्यांना जोडणार्‍या मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी तर बंगळुरु-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी 466 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 500 कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.मुंबई, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 2584 कोटींची तरतूद असून मुंबई मेट्रो प्रकल्पाकरिता 1 हजार 87 कोटी, नागपूर मेट्रोकरिता 683 कोटी तर पुणे मेट्रोकरिता 814 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या एमयूटीपी-3 प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेल्या 908 कोटींच्या निधीमुळे उपनगरी रेल्वेसेवेचा दर्जा अधिक उंचावणार आहे. महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असा सूर काही विरोधी नेत्यांनी लावला असून काही माध्यमांनीही त्या सुरात सूर मिसळला आहे. अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा याविषयीच्या अज्ञानातून किंवा राजकारणातून हे घडू शकते. त्यामुळे या नेत्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरविण्याआधी अर्थसंकल्पाचे वाचन करावे किंवा जाणकारांकडून तो समजून घेण्याचा सल्ला देखील दाणी यांनी विरोधकांना दिला. यावेळी भाजपचे भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येसूलाल उपराडे, सीए दिनेश दादरीवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.