Home Uncategorized किटकजन्य आजाराची चित्ररथ मायकिंग द्वारे जनजागृती

किटकजन्य आजाराची चित्ररथ मायकिंग द्वारे जनजागृती

26
0

दि. 27 फेब्रुवारी रोजी आरोग्य विभाग,हिवताप विभाग व फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्ह्यातील सालेकसा,देवरी,गोरेगाव,सड़क अर्जुनी,अर्जुनी मोरगाँव या तालुक्यातील हिवताप अतिसंवेदनशील गावात किटकजन्य आजार तसेच मलेरिया आणि डेंग्यू बाबतची जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा प्रशिक्षण कार्यालयातील परिसरात संपन्न झाले.
किटकजन्य जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी हिरवा झेंडा देऊन चित्ररथ गावोगावी जनजागृती करण्यासाठि रवाना केला.यावेळी विशेष उपस्थिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,के.टी.एस.शासकीय सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,जिल्हा आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात,फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा,देवरी,गोरेगाव,सड़क अर्जुनी,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील किटकजन्य आजारा करीता अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मलेरिया आणि डेंग्यू च्या निर्मूलनासाठी एम्बेड प्रकल्पाच्या स्वंयसेवी कार्यकर्ता मार्फत अतिसंवेदनशील गावात विविध जनजागृतीपर उपक्रम घेतले जात असल्याची माहीती फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी दिली आहे.त्याचाच एक भाग म्ह्णुन चित्ररथाच्या माध्यमातुन अतिसंवेदनशील गावातुन किटकजन्य आजार,मलेरिया आणि डेंग्यू बाबतची जनजागृती करुन लोकांमध्ये प्रतिबंधात्मक सवयी व आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.
किटकजन्य चित्ररथाच्या माध्यमातुन आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा, घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा, * पाण्याचे टँक तथा बैरेल स्वच्छ ठेवा, टँक उघडे ठेवू नका, सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा, घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे, घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा,पाणी उघडे ठेवू नये असे विविध आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
किटकजन्य जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन अनुषंगाने यावेळी फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्ह्याचे प्रकल्प समन्वयक हिमानी यादव ,खुमेश बिसेन,विश्वदीप नंदेश्वर, विक्रांत कालसर्पे,नुपुर कटरे, कुलदिप पुस्तोडे,भुषण कापसे तसेच हिवताप विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक किशोर भालेराव,डोंगरे, ठाकूर,जायभाय, दिपवादे,आशिश बले,पंकज गजभिये,वर्षा भावे यांचे सह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.