“स्टेमी” मुळे कार्डिअॅक कॅथलॅब व हृदयरोगविषयक उपचार थ्रोंबोलीसीस, अॅजीओप्लास्टी, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट(CABG) म्हणजे हृदयाची बायपास शस्त्रक्रिया सारखे आजारावर मोफत उपचार मिळणार
-डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
गोंदिया एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रक्शन (एसटीईएमआय)हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे. मराठीत याला हृदयविकाराचा झटका म्हणतात. एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रक्शन (एसटीईएमआय) म्हणजेच “स्टेमी ” हे हृदयरोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यु चे प्रमाण कमी करणे आणि हृदय रोगाची लक्षणे तसेच तसेच उपलब्ध निदान व उपचार सुविधा याबाबत जन समान्यांमध्ये जागृता निर्माण करणे असुन प्रमुख उदिष्टासह सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “स्टेमी”महाराष्ट्र हब १२ जिल्हयामध्ये राबविण्यात येत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी दिली आहे.
हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला किंवा रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये अडथळा निर्माण झाला की, हृदयविकाराचा झटका येतो.विशेषतः हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्युचा टक्का वाढला आहे.वयोमान कमी झाले आहे.हृदयविकाराने होणारे मृत्यू काही प्रमाणात रोखण्यासाठी शासनामार्फत निशुल्क “स्टेमी” हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी दिली आहे.गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्याने जीव वाचविण्यात स्टेमी प्रकल्प प्रभावी ठरणार आहे.
झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध दिले जाते. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाते.हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय शस्त्रक्रिया करण्याची सोय असलेल्या मोठ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश ‘हब’ मध्ये असणार आहे.त्यामुळे अँजीयोओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सहभागी असलेले खासगी रुग्णालये यांचाही समावेश या स्टेमी प्रकल्पातील हबमध्ये करण्यात येत आहे.
“स्टेमी” प्रकल्पनुसार हृदयविकाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना स्पोकस्तरावर निःशुल्क ईसीजी व क्लाऊड तंत्रज्ञान सुविधेच्या मदतीने तज्ञांमार्फत ईसीजी विष्लेषण सेवा दिली जात आहे.”स्टेमी” निदान झाल्यास रुग्णांना स्पोक स्तरावर त्वरित थ्रोंबोलीसीस उपचार प्रदान करुन तद्नंतर पुढील उपचारा करीता हब संस्थेस संदर्भीत करणे अपेक्षित असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी म्हटले आहे.
“स्टेमी” प्रकल्पाचा राज्यातील सर्व शासकीय जिल्हा रुग्णालयात विस्तार करण्यात येत असून सदर प्रकल्पाकरीता जिल्हयातील कार्डिअॅक कॅथलॅब व हृदयरोगविषयक उपचार थ्रोंबोलीसीस ,अॅजीओप्लास्टी,कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट(CABG) म्हणजे हृदयाची बायपास शस्त्रक्रिया ईत्यादी यांची अहोरात्र दिवस रात्री उपलब्धता असणाऱ्या महात्मा जोतिबाराव फुले जनआरोग्य योजनेत (MIPJAY) समाविष्ठ खासगी / धर्मदाय रुग्णालये, यांचा प्रकल्पात हब स्वरुपात समावेश करण्यात आला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी दिली आहे.
या करीता जिल्हयातील महात्मा जोतिबाराव फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ खासगी /धर्मदाय रुग्णालये यांच्या मार्फत गोंदिया जिल्हयात “स्टेमी” महाराष्ट्र हब स्थापीत करण्याकरीता जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ.अमरीश मोहबे यांनी केले आहे.सदर अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे स्वीकारण्यात येत आहे.
स्टेमी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना ‘गोल्डन अवर”मध्ये उपचार देत जीव वाचविता येणार आहे.
Home Uncategorized “स्टेमी” महाराष्ट्र हब स्थापीत करण्याकरीता जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी पुढे यावे..
