Home Uncategorized राजेश घासले यांचा PSI मुख्य परीक्षेत उल्लेखनीय यश; संघर्षातून विजयाची प्रेरणादायी कहाणी

राजेश घासले यांचा PSI मुख्य परीक्षेत उल्लेखनीय यश; संघर्षातून विजयाची प्रेरणादायी कहाणी

63
0

गोंदिया : स्थानिक एम.आय.टी. कॉलेज, कुडवा येथील सर्वसाधारण कुटुंबातील राजेश हिरालाल घासले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2022 साली झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे. राजेश घासले यांनी आपली पहिली नोकरी कारागृह विभागात पोलिस पदावर सुरू केली होती. परंतु, उच्च शिक्षणासाठी अभ्यास करण्याच्या गरजेने त्यांनी भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत तंत्रज्ञ (टेक्निशियन) म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांच्या मनोबल, जिद्द, आणि कठोर परिश्रमामुळे त्यांनी PSI परीक्षेत हे यश मिळवले आहे. एमपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन जनसामान्यांच्या सेवेत योगदान देण्याचे त्यांचे स्वप्न आता साकार झाले आहे. राजेश घासले यांनी सांगितले, “मी लहानपणापासूनच विविध प्रकारची कामे करून शिक्षण घेतले. गरीबीच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, मी टॅक्सी-ऑटो चालवून आणि शेतकिय खंते विकून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला. माझा अभ्यास नेहमी सुरू राहिला आणि त्यामुळेच मी या परीक्षेत यश मिळवले. राजेश घासले यांच्या यशाबद्दल सुभाष चुलपार, बाळकृष्ण घासले, चैतराम कोल्हारे, प्रवीण नाईक, शिवानंद फरदे, रमेश कलाम, संदीप लामकासे, कमलेश वाढई, प्रमिला घासले, जागृती घासले, छाया चुलपार, बाळा बावनथडे, सूरज पंधरे, गोविंद राऊत, रुपेंद्रकुमार किरसान, योगेंद्र किरसान, भुमेंस्वर दियारी, अजय फरदे, मुंनालाल भोयर, आतिश पुराम, हरिकिश्र्न लामकासे, हुशन लामकासे आणि इतर विद्यार्थी, नातेवाईक, आदिवासी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या राजेश घासले भंडारा येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.