Home Uncategorized पदावर असो, की नसो लोकसेवेसाठी सदैव समर्पित : संजय पुराम

पदावर असो, की नसो लोकसेवेसाठी सदैव समर्पित : संजय पुराम

74
0

सालेकसा, (गोंदिया) : मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे आमच्या राष्ट्रसंतानी सांगितले आहे. त्यांच्याच विचाराचा पाईक असून मी सुद्धा विद्यार्थी जीवनापासूनच लोकसेवेसाठी समर्पित आहे. कोणत्याही पदावर मी असो किंवा नसो माझ्या घरी नेहमीच जनता दरबार लागला असतो व स्वखुशीने लोकांच्या समस्या सोडवत असतो. त्याचाच परिणाम की मला आमगाव-देवरी-66 विधानसभेचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सन 2019 मध्ये निसटत्या मताने माझा पराजय झालं तरी खचलो नाही, दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलो. कोणत्याही पदावर असलो किंवा नसलेतरी लोकसेवेसाठी समर्पित आहे, असे उद्गार माजी आमदार संजय पुराम यांनी केले.

सालेकसा येथे पूर्ती पब्लिक स्कूलच्या पटांगणात आयोजित रक्तदान, डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना गोंदिया भाजप जिल्हाध्यक्ष एड. येशुलाल उपराडे यांनी संजय पुराम सारख्या युवा नेत्याची गरज जनतेला व भाजपला असल्याचे सांगत पुराम यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, जनतेचे प्रेम बघून मला कधीच वाटले नाही की, मी माजी आमदार आहे. या प्रसंगी भाजपाचे जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी तर संजय पुराम यांना भविष्याचे मंत्री म्हणून संबोधले. तर गोंदिया भंडाराचे संपर्क मंत्री वीरेंद्र (बाळा) अंजनकर यांनी आणखी शक्तीने जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला. तर माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकरांनी जनतेला भाग्यवान सांगितले, की संजय पुराम सारखा उर्जावान नेता येथील जनतेला मिळाला. प्रास्ताविक भाषण कार्यक्रमाचे मुख्य आयोजिका जी.प. महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांनी केला.

तर सूत्रसंचालन जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी प.स. सदस्या प्रतिभा परिहार यांनी केला. आभार प्रदर्शन भाजप नेते व पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा चे संचालक राजेंद्र बडोले यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सालेकसा,देवरी व आमगाव या तिन्ही तालुक्यातील सर्व प्रकोष्ठाच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच जि.प. चे आजी-माजी सर्व सदस्य, प.स. चे सर्व सभापती- उपसभापती, प. स.सदस्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमात आमगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पूर्ती पब्लिक स्कूलच्या मुख्य संचालिका शाललिनी बडोले यांच्या नेतृत्वात युवा भाजपा जिल्हा सचिव टिकेश बोपचे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह आपली जबाबदारी पार पाडली. तर भाजप तालुका मंडळ अध्यक्ष गुमामानसिंग उपराडे, युवा मोर्चा अध्यक्ष देवराम चुटे, आदिवासी आघाडी अध्यक्ष सरोज परतेती,महिला भाजपा अध्यक्षा. मधु अग्रवाल यांनी आपली-आपली जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हजारोंच्या संख्येने डोळ्याच्या रुग्णांनी डोळे तपास करून चष्मे घेतले तर काहीना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर व जनतेसाठी जेवणाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्यास निसर्गाने ही हातभार लावले व कार्यक्रम संपताच पावसाने झोडपून काढले, हे विशेष.