तिरोडा, (गोंदिया) : तिरोडा गोरेगाव मतदारसंघातील जनतेसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत 40.17 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी 62.72 कोटी रुपये रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे तिरोडा मतदारसंघातील विविध गावांमध्ये रस्त्यांची सुधारणा होणार आहे.आमदार विजय रहांगडाले यांनी या योजनेतून गावागावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा सिद्धता दिली आहे. या योजनेमुळे तिरोडा मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि स्थानिक विकासाची गती वाढेल. मंजूर निधीतून प्रामुख्याने तिरोडा तालुक्यातील तिरोडा बसस्टाप ते मलपुरी रस्ता या 4.94 किमी रस्त्याकरिता 858.63 लक्ष रुपये, खमारी खडकी ते डोंगरगाव रस्ता 3.75 किमी रस्त्याकरिता 614.66 लक्ष, बोदा ते सेजगाव रस्ता 3.15 किमी रस्त्याकरिता 47.63 लक्ष, सर्रा ते मारेगाव भजेपार रस्ता 3.40 किमी रस्त्याकरिता 494.37 लक्ष, धादरी, बेलाटी ते कवलेवाडा रस्ता 4.78 किमी रस्त्याकरिता 758.45 लक्ष, बरबसपुरा ते धामनेवाडा रस्ता 5.47 किमी रस्त्याकरिता 853.72 लक्ष, बोदा ते गोमाटोला रस्ता 4.02 किमी रस्त्याकरिता 505.09 लक्ष तसेच गोरेगाव तालुक्यातील डोंगरुटोला ते पाथरी 4.18 किमी रस्त्याकरिता 636.65 लक्ष आणि गोंदिया तालुक्यातील दांडेगाव, सहेसपूर ते कारूटोला रस्ता 6.48 किमी रस्त्याकरिता 1071.86 लक्ष या कामांचा समावेश आहे.

