Home गोंदिया जिल्हा हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मनमोहक काव्य सादरीकरणाने पोवारी दिन साजरा करण्यात आला

हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मनमोहक काव्य सादरीकरणाने पोवारी दिन साजरा करण्यात आला

40
0

गोंदिया : अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघ दरवर्षी आपल्या समाजाची अस्मिता, इतिहास, संस्कृती आणि भाषा यांच्या सन्मानार्थ सम्राट विक्रम “विक्रमादित्य” यांच्या राज्याभिषेक दिनी आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर “पोवारी दिन” कार्यक्रमाचे आयोजन करते. लोकांना त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
सम्राट विक्रमादित्यने आपल्या अवंती (मालवा राजपुताना) राज्यातून परकीयांना हाकलून एक मजबूत आणि संघटित राज्य स्थापन केले होते. त्यांच्या विजयाच्या निमित्ताने त्यांनी “विक्रम संवत” हे कॅलेंडर सुरू केले आणि दरवर्षी या पवित्र दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघाने आपला आदर्श राजा सम्राट विक्रमादित्य यांना आदरांजली वाहण्यासाठी “पोवारी दिन” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सम्राटांना आदरांजली अर्पण करत पोवारी भाषेतील साहित्य संमेलन आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघाचे अध्यक्ष डॉ.विशाल बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलीत करून माता सरस्वती आणि चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांच्या चित्राला शारदा चौधरी यांनी माल्यार्पण तसेच इंजि. गोवर्धन बिसेन यांनी स्वरचित सरस्वती वंदना मंत्रमुग्ध सादरीकरणाने झाली. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री मुन्नालाल जी रहांगडाले, श्री कोमल प्रसाद जी रहांगडाले आणि श्री ऋषी जी बिसेन उपस्थित होते. “पोवारी दिन” कार्यक्रमात श्री.यशवंत कटरै, डॉ.प्रल्हाद हरिणखेडे ‘प्रहरी’, अभियंता गोवर्धन बिसेन ‘गोकुल’, प्राचार्य डॉ.शेखराम जी येडेकर, श्री.रणदीप बिसेन, श्री.रमेश जी बोपचे आनंदवन, सौ. वर्षा विजय रहांगडाले, सौ. शारदा चौधरी, श्री हृषीकेश गौतम, श्री हिरदीलालजी ठाकरे, डॉ. हरगोविंदजी टेंभरे या ज्येष्ठ साहित्यिकांनी सुंदर आणि आनंददायी काव्य सादरीकरण केले.
अभियंता श्री महेंद्र जी पटले यांनी कार्यक्रम यशस्वीपणे व शिस्तबद्धरित्या पार पाडला. कार्यक्रमात महासंघाचे अध्यक्ष डॉ.विशाल जी बिसेन यांच्यासह सर्व वक्त्यांनी या शुभ प्रसंगी अभिनंदन व शुभेच्छा देताना छत्तीस कुल पोवार समाजाचा गौरवशाली इतिहास व संस्कृती जतन करण्याची तसेच सर्व स्वजातीय बंधू-भगिनींपर्यंत नेऊन समाजाची एकता आणि अखंडता मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील वैचारिक आणि सांस्कृतिक अधोगती रोखण्यासाठी तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. पोवारी भाषा आणि तिची प्राचीन गाणी आणि संगीत जतन करून त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही या कार्यक्रमात घेण्यात आला.
पोवार महासंघाचे सरचिटणीस श्री नरेश जी गौतम यांनी या कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुणे, वक्ते आणि साहित्यिकांचे आभार मानले. अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघाच्या साहित्य समितीचे अध्यक्ष श्री गोवर्धन जी बिसेन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. हा कार्यक्रम दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय पोवारी दिन’ म्हणून साजरा करण्याचाही प्रस्ताव पारीतसकरण्यात आला. या कार्यक्रमात अनेक स्वजातीय बंधू भगिनी उपस्थित होते आणि आपल्या समाजाच्या संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाने सजलेल्या साहित्यकृतींचा आस्वाद घेत त्यांनी आपले आराध्य दैवत आणि समाजाचे नेते अवंती राजा आणि पंवार सम्राट विक्रमादित्य यांना आदरांजली वाहिली.