प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित
गोंदिया : भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याचे अधिवेशन 4 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनमध्ये आयोजीत करण्यात आले आहे. अधिवेशनाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खा. अशोक नेते, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, माजीमंत्री राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी खा. सुनील मेंढे, आ. विजय रहांगडाले, भंडारा-गोंदिया जिल्हा समन्वयक विरेंद्र अंजनकर, माजी आ. खोमेश रहांगडाले, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. केशवराव मानकर, माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी आ. संजय पुराम, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. भजनदास वैद्य, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिप गटनेता लायकराम भेंडारकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जिप महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, जिप अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. अधिवेशनाला जिल्हा पदाधिकार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. येसूलाल उपराडे, जिल्हा महामंत्री सुनील केलनका, सीता रहांगडाले, अनिल येरणे, डॉ. नाजूक कुंभरे तसेच सर्व आघाडी, प्रकोष्ठ व मंडळ जिल्हाध्यक्ष व अध्यक्षांनी केले आहे.

