Home Uncategorized आ. रहांगडाले यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

आ. रहांगडाले यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

106
0

तिरोडा, (गोंदिया) : विधानसभा क्षेत्रात सिंचनविषयक सुविधांबरोबरच शैक्षनीक क्षेत्रात विकासाचे पाऊल टाकत तिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या तर्फे जिल्हा परिषद तसेच नगर परिषद क्षेत्रातील इयत्ता 1 ली व 2 रीच्या विध्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यामध्ये विधानसभा क्षेत्रातील तिरोडा व गोरेगाव तालुक्याचा समावेश असून विद्यार्थी संख्या बघता पूरवठादाराकडून वेळेवर पुरवठा न होऊ शकल्याने गोंदिया तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या 15 दिवसात वाटप होणार आहेत. तसेच इयत्ता 3 री व 4 थीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा वाटप होणार असल्याची माहिती आमदार यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी बॅग भेट मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार यांच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.