Home Uncategorized वनकर्मचाऱ्यांनी कसली कंबर; कोसमतोंडी क्षेत्रातील अतिक्रमावर कारवाई

वनकर्मचाऱ्यांनी कसली कंबर; कोसमतोंडी क्षेत्रातील अतिक्रमावर कारवाई

128
0

सडक अर्जुनी, (गोंदिया) : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय कोसमतोंडीमधील मालीजुंगा, मुरपार परिसरातील लोकांनी अतिक्रमण केले. ते अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मागील दोन दिवसापासून कोसमतोंडी परिसरात अतिक्रमण काढण्याचा सपाटा सुरू आहे.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात 7 सह वनक्षेत्र कार्यालय आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठा वनपरिक्षेत्र कार्यालय म्हणून ओळखला जातो. वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांच्या मार्गदर्शनात सहवनक्षेत्र अधिकारी फुलचंद शेंडे, वनरक्षक सरिता धनभाते, राम सिसोदे, सारिका नागपुरे, नितेश ठवकर, मंदा बिसेन, चुडामन पुस्तोडे, सुरेंद्र ढबाले, विजय पुस्तोडे यांच्या सहकार्याने कोसमतोंडी परिसरात जंगलात होणाऱ्या अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत येणाऱ्या मालिजुंगा कंपार्टमेंट नंबर 691, 179, 214 मध्ये कारवाई करून 12.44 आर संरक्षण क्षेत्र अतिक्रमण काढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी संरक्षण क्षेत्रात अतिक्रमण केले. त्यांच्यावर नोटीस बजावले आहेत. येणाऱ्या पुढील काळात त्या काढलेल्या क्षेत्रात रोपवण्याचे काम हाती घेतल्या जातील, असे क्षेत्रसहाय्यक शेंडे यांनी सांगितले आहे. तालुक्यातील जंगला लगत असलेल्या गाव परिसरात अतिक्रमण होत असते. त्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील संरक्षित वन हे 18,615 हेक्टर आर क्षेत्रात विस्तीर्ण आहे. सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेमुळे तालुक्यात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ज्यानी वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचे वाहन जप्त करण्याच्या सूचना वनकर्मचाऱ्यांना दिले आहेत.

कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना

सडक अर्जुनी तालुक्यात वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांध्या काढण्याचा सपाट काही लोकांनी केला आहे. त्यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्यांनी सजग राहण्याची नितांत गरज आहे. वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना वन जमिनीत अतिक्रमण होत असेल तिथे अतिक्रमण करू न देता संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मिथुन तरोने, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी