Home Uncategorized .गोंदिया येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समिती कडून काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार...

.गोंदिया येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समिती कडून काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

44
0


गोंदिया दि 23 फेब्रुवारी 2025
नुकतेच काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी प्रसार माध्यमातून नुकतेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांना स्वप्न पडतात, विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्व संतानमुळे व संघामुळे यश मिळाले म्हणणे म्हणजे मतदाराचा अपमान आहे व ते संत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली
या विजय वड्डेटीवारर यांच्या वक्तव्या विरोधात गोंदिया जिल्हा श्री संप्रदाय कडून आज दिनांक 23 फेब्रुवारी ला 5 वाजता गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी, जिल्हा अध्यक्ष मुलचंद खांडवाये, निरीक्षक नवरंग मेश्राम, महिला निरीक्षक वैशाली चतुर, जिल्हा कर्नल प्रकाश कोरे, महिला अध्यक्ष ताराताई राऊत, रोशन कुर्वे, जयपाल खांडवाये, पंकज खांडवाये, दामोदर शेंडे यासह जिल्हा कमेटी पदाधिकारी व तालुका पदाधिकारी व 200 च्या जवळपास भाविक उपस्थित होते.