अर्जुनी मोरगाव: दि गोंदिया जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘आमदार चषक’ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. तालुका क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत जिल्ह्यातील मुले, मुली, पुरुष आणि महिला खेळाडू आपले क्रीडा कौशल्य सादर करतील. या सोहळ्याचे उद्घाटन अर्जुनी मोरगावचे आमदार मा. श्री. राजकुमारजी बडोले यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. लायकरामजी भेंडारकर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सौ. मंजुषा बारसागडे, एस.डी.ओ. सौ. ज्योती कांबळे,तहसीलदार श्री. अनिरुद्ध कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भोजराज चौधरी, भाजप जिल्हा महामंत्री श्री. प्रशांत शहारे, पंचायत समिती अध्यक्ष सौ. आम्रपाली डोंगरवार, बाजार समिती अध्यक्ष श्री. यशवंत परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री. लोकपाल गहाणे आणि भाजप मंडळ अध्यक्ष श्री राधेश्याम भेंडारकर,श्री. राजेश कठाणे पंचायत समिती उपाध्यक्ष श्री. संदीप कापगते, वरिष्ठ पत्रकार आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन दि गोंदिया जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजकुमार एस. कुथे आणि उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र फुन्डे
डॉ. महेंद्र हेमणे, भंवर डोये, किशोर तवाडे, कार्तिक पटेल, पूर्वा फुन्डे, अंकित राठोड, मुकुल अग्रवाल, ठाणेन्द्र पवार, युवराज वाघमारे, महेश पालीवाल, दिवाकर चुटे, सौ. माधुरी वनवे, पुरुषोत्तम घाटोळे आदी सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून खेडळूंचे उत्साह वाढवावे असे आवाहन केले आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.



