गोंदिया, दि.12 : सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी क्रीडा व खेळांची नितांत आवश्यकता आहे. आज क्रीडा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण होत असून, खेळाडूंना/नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने जलतरण करण्याची/शिकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्याचा लाभ सर्व खेळाडूंनी/नागरिकांनी घ्यावा यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समिती, गोंदिया यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथील जलतरण तलाव (25 बाय 50 मीटर), निविदा मंजुरीच्या तारखेपासुन एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर चालविण्याकरीता तथा दैनंदिन देखभालीच्या जबाबदारीसह कंत्राट करण्याकरीता याद्वारे अनुभवी व सक्षम संस्था अथवा व्यक्तींकडून निविदा मागविण्यात येत आहेत.
यासाठी विस्तृत कोरे फॉर्म, निविदा सूचना, अटी व शर्ती दिनांक 13 ते 20 मार्च 2026 पर्यंत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11.00 वाजेपासून ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी सदरचे कोरे फॉर्म कार्यालयातून घेऊन दिनांक 13 ते 20 मार्च 2026 पर्यंत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11.00 वाजेपासून ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सचिव, जिल्हा क्रीडा संकुल समिती, गोंदिया यांनी केले आहे.


