Home Uncategorized आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे प्रशिक्षण

आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे प्रशिक्षण

36
0

   गोंदिया, दि.23 : आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी कार्यालयाचे स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे वर्ष 2026-27 चे पहिले सत्र दि.1 एप्रिल ते 15 जुलै 2026 या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी जमातीमधील (अनुसूचित जमाती प्रवर्ग) उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसह अर्ज कार्यालयास सादर करावा. योजनेचे स्वरुप व उमेदवारांच्या पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

   प्रशिक्षणार्थ्यांची शैक्षणिक व इतर पात्रता : या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान इयत्ता 10 वी पास असावा. उच्च शैक्षणिक पात्रताधारक व टंकलेखक/संगणक/लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. उमेदवार आदिवासी जमाती (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील असावा. यासाठी स्त्री व पुरुष दोन्ही पात्र आहेत. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्याचा रहिवासी असावा. उमेदवाराने सदर प्रशिक्षणाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. उमेदवाराकडे रोजगार व स्वयंरोजगार (एम्पलॉयमेंट) कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असावे. राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची व आधारकार्डची छायांकीत प्रत सादर करावी.

    प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस म्हणजेच दि.1 एप्रिल ते 15 जुलै 2026 असा राहील. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील. असे  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी देवरी वि.मा. पांडव यांनी कळविले आहे.