Home गुन्हेवार्ता सराफा व्यवसायीकाच्या घरून २ लाखाचे दागिने उडविले

सराफा व्यवसायीकाच्या घरून २ लाखाचे दागिने उडविले

89
0

चुरडी येथील घटना
तिरोडा :
तालुक्यातील चुरडी येथे सराफा व्यवसायीकाच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३ हजार रुपया किंमतीचे दागिने उडविले. ही घटना १३ एप्रिलच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर असे की, तालुक्यातील चुरडी येथील विनोद खरवडे यांचे तिरोडा येथे ज्वेलरीचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे फिर्यादी विनोद खरवडे हे घराला कुलूप लावून दुकानात आले. रात्री त्यांचा मुलगा घरी पोहचला असतांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. तसेच आलमारीतील सामान अस्तव्यस्त होते. तपासणी केली असता, लॉकरमधील २ लाख ३ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.