Home गुन्हेवार्ता जिल्ह्याला वादळ व अवकाळीचा पुन्हा इशारा

जिल्ह्याला वादळ व अवकाळीचा पुन्हा इशारा

77
0

१.३० लाखाचा मुद्देमाल जप्त, देवरी पोलिसांची कारवाई
गोंदिया :
मागील आठवड्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार ऑरेंज अलर्ट संपुष्टात आल्यानंतर येलो अलर्टचा इशारा दिला होता. दोन दिवस वातावरण स्वच्छ राहिल्यानंतर पुन्हा आज वादळीवार्‍यासह गारपीटचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या वर गेला होता. मात्र आठवड्याभरापासून जिल्ह्यात अवकाळीने दस्तक दिली. या अवकाळीचा फटका या पिकांसह गहू, मका पिकांना बसला. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील धान पिकाला या पावसाचा लाभ होणार असला तरी धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यातच येलो अलर्टचा धोका कायम असल्याने हा अवकाळी पाऊस शेतकर्‍यांना आर्थिक डबघाईस आणण्यासाठी कारणीभूत ठरल्याचेही आता चित्र जिल्ह्यात दिसून आले असताना पुन्हा हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी रब्बी हंगामातील पिक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
…………..
महावितरणचा अलर्ट
भारतीय हवामान विभागाने वादळी वार्‍यासह गारपीटचा इशारा दिला आहे. याचा फटका विद्युत वाहिन्यावर पडत असतो. परिणामी नागरिकांनीही या काळात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून सोशल मिडीया तसेच अनेक ग्राहकांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आला आहे.