Home Uncategorized विकासाचा नवा अध्याय घडवायला आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी निष्ठेने साथ द्यावी : खा....

विकासाचा नवा अध्याय घडवायला आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी निष्ठेने साथ द्यावी : खा. प्रफुल पटेल

125
0

गोंदिया : भंडारा जिल्ह्याला विकासाची गति द्यायची आहे. दोन्ही जिल्हा शेती प्रधान आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याची प्रथा चालू केली. शेतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सिंचनाची साधने, लाडकी बहीन योजना, वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत, मुलींना उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, युवकांना युवा प्रशिक्षण योजना अश्या अनेक योजनांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला व प्रगतीला गती देऊन परिवर्तन करण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे. परंतु हिच गती कायम ठेवण्यासाठी व निरंतर विकासाचा नवा अध्याय घडवायला आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी निष्ठेने विधानसभेला साथ द्यावी, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. आमगाव तालुक्यातील रिसामा येथील विजया लक्ष्मी सभागृहात आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आमगांव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. कार्यकर्त्ता मेळाव्याला खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रेमकुमार राहंगडाले, प्रभाकर दोनोडे, रमेश ताराम, पूजा अखिलेश सेठ, सुरेश हर्षे, टिकाराम मेंढे, कमलबापु बहेकार, सी. के. बिसेन, अजय उमाटे, कविता राहंगडाले, गोपाल तिराले, सुभाष यावलकर, बिसराम चर्जे, सीमाताई शेंडे, सुमन बिशेन, परबता चांदेवार, शीला ब्राम्हणकर, हिना टेभरे, रवि क्षिरसागर, राजेश भक्तवर्ती, विनोद कन्नमवार, अनिल शर्मा, गोपाल तिवारी, जियालालभाऊ पंधरे, पियुष झा, नामदेव दोनोडे, भय्यालाल चांदेवार, पंकज शहारे, कैलास रहांगडाले, डॉ. बाबुराव ब्राह्मणकर, टेकचांद हरीणखेडे, भ्रूगलास्तव गिरी महाराज, लखन चुटे, संजू रावत, जयप्रकाश पटले, सोनू अग्रवाल, मूलचंद बघेले, महेंद्र रहांगडाले, स्वप्निल कावळे, सुनील ब्राह्मणकर, राजकुमार प्रतापगडे, प्रमोद शिवणकर, रमण डेकाटे, सुनील ब्राह्मणकर, रवींद्र मेश्राम, कांताबाई रहिले, महेंद्र रहांगडाले, गणेश हर्षे, चुनीलालजी साहारे, प्रमोद शिवणकर, सिंधुताई भुते, राजेश मटाले, लक्ष्मण नागपुरे, संगीताताई ब्राह्मणकर, महादेव हटवार, ताराचंद नामूर्ती, बबलू बिषेन, संजू डोये, सेवकराम डोये, रामचंद्र ठाकरे, अनिल फुंडे, पुरुषोत्तम चुटे, सौरभ डोंगरे सहित मोठ्या पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.