Home Uncategorized मक्कीटोला येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; स्था.गु. शाखेची कारवाई

मक्कीटोला येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; स्था.गु. शाखेची कारवाई

101
0

गोंदिया : आमगाव तालुक्यातील मक्कीटोला (सुरकुडा) येथे 42 हजार 500 रुपयांची घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस पथकाद्वारे गुरुवार, 1 ऑगस्ट रोजी करण्यात आली. धर्मेंद्र मनिराम मडामी (वय 29, रा. मक्कीटोला, ता.आमगाव) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आमगाव तालुक्यातील मक्कीटोला (सुरकुडा) येथील मुन्नालाल भैयालाल ठाकरे (वय 64) हे 25 जुलै रोजी सकाळी 10 ते 12.30 वाजता दरम्यान शेतावर गवत आणण्यास गेले होते. तसेच त्यांची पत्नी व मुलगा हे सुद्धा बाहेर गेले होते. घरी कोणीही हजर नसताना त्यांच्या घराच्या समोरील दरवाज्याचा कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील लोखंडी आलमारीचा दार तोडून आलमारीतील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आमगाव पोलिसांनी अपराध. क्र. 319/2024 कलम 305(अ), 331(3) भा. न्या. सं.- 2023 अन्वये गुन्हा दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आमगाव परिसरात सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे -गुन्हेगारांचा शोध व गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. मात्र, 1 ऑगस्ट रोजी पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीच्या आधारे संशयित आरोपी धर्मेद्र मनिराम मडामी (वय-29 वर्षे रा. मक्कीटोला, ता. आमगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता संशयिताने प्रथमतः उडवा उडवीची उत्तरे दिले. पुन्हा विश्वासात घेवून कसून सखोल विचारपुस चौकशी केली असता नमूद घरफोडी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हातील चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई तपासाकरीता आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे निर्देशान्वये व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्णे, मपोउपनि वनिता सायकर, पोलीस अंमलदार विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बिसेन, पो.शि. हंसराज भांडारकर, चा.पो.हवा. लक्ष्मण बंजार यांनी केली.