माजी नगराध्यक्ष अजयसिंह गौर यांचे आवाहन : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा
तिरोडा, (गोंदिया) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुक्रवारी (ता. 2) दुपारी 12.30 वाजता स्थानिक कुंभारे लॉन येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अजयसिंह गौर यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. प्रफुल्लभाई पटेल राज्यसभेत निवडून आल्यानंतर त्यांचे प्रथमच तिरोडा शहरात आगमन होत आहे. त्यानिमीत्त माजी आमदार मा. श्री. राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यांतर्गत बिर्सी येथेच खासदार प्रफुल्लभाई पटेल यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. दरम्यान बिर्सी येथून कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढण्यात येणार आहे. पुढे कुभारे लॉन येथे मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमांर्तगत विविध संघटनांच्या वतीने खासदार मा. श्री. प्रफुल्लभाई पटेल यांचे स्वागत करण्यात येणार आहे. कार्यकर्ता मेळाव्याला खासदार मा. प्रफुल्लभाई पटेल मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी आमदार मा. श्री. राजेंद्रजी जैन, आमदार मा. श्री. मनोहरजी चंद्रिकापूरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रेमकुमार रंहागडाले, महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. योग्रेद्र भगत, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश जायस्वाल, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. केतन तुरकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज डोंगरे, माजी नगराध्यक्ष श्री. नरेश कुंभारे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती अश्विनी पटले, जिल्हा परिषद सदस्य श्री. जगदीश बावनथडे, श्री. किरण पारधी, पंचायत समिती सदस्या श्रीमती रिता पटले, श्री. विजय बिन्झाडे, श्री. जितेंद्र चौधरी उपस्थित राहणार आहेत. गोंदिया जिल्हयाच्या विकासात मा. प्रफुल्ल पटेल यांचे मोठे योगदान आहे. शहराचा औद्योगीक विकास साधण्यासह शेतकऱ्यांचा मालाला चांगला हमी भाव मिळावा, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी मा. प्रफुल्ल पटेल यांचे अविरत कार्य राहीले आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची राज्यातील सर्व महिलांना दिलेली मोठी भेट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासह महिलांनी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सर्व सेलचे पदाधिकारी तथा नागरीकांनी या मेळाव्यात मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अजयसिंह गौर यांनी केले आहे.
