Home गुन्हेवार्ता निवडणुकीच्या पथ्यावर ४.०७ कोटीची मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या पथ्यावर ४.०७ कोटीची मुद्देमाल जप्त

76
0

पोलिस, महसूल, आबकारी विभागांच्या पथकांची कारवाई
गोंदिया :
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक शांतता -सुव्यवस्था तसेच पारदर्शकपणे पार पाडावी, यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचार संहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान यंत्रणेचे पथक मुस्तेदीने कामाला लागले आहे. ठिकठिकाणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. तर दुसरीकडे पोलिस विभागाकडून अवैध व्यवसायीकांविरुद्ध कारवाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पथ्यावर विविध विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्यात ४ कोटी ७ लाख ८९ हजार १४४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १ कोटी ८१ लाख ८५५ रुपयाची रोकड आहे.
गोंदिया जिल्ह्यात लोकसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पडावी या अनुषंगाने यंत्रणा कामाला लागली आहे. आचार संहितेची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणाने केली जात आहे. आचार संहितेचे नियम कुणाकडूनही भंग होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. दरम्यान गोंदिया जिल्हा राज्याच्या शेवच्या टोकावर असल्याने मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी तापसणी नाके उभारण्यात आले आहेत. पोलिस विभाग, आयकर विभाग, विक्रीकर विभाग, आबकारी विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग, आरपीएफ यासह अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत. एसएसटी, जीएसटी असे पथक विशेष नजर ठेवून आहेत. जिल्ह्यातील तपासणी नाके व पोलिस विभागाकडून निवडणुकीच्या पथ्यावर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १ कोटी ८१ लाख ८५५ रुपयाची रोकड व २ कोटी २६ लाख ६४४ रुपयाचा इतर मुद्देमाल ( दारु, गांजा, शस्त्र व इतर साहित्य) असा एकूण ४ कोटी ७ लाख ८९ हजार १४४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.