जानाटोला गाव शिवारातील घटना
गोरेगाव : गोरेगाव -कोहमारा मार्गावरील जानाटोला पेट्रोल पंपजवळ भरधाव मोटारसायकलवर रानडुक्कर रस्ता ओलांडतांना आदळली. दरम्यान मोटारसायकलस्वार तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज १५ एप्रिलच्या सकाळी ७ वाजता सुमारासची आहे. दिनेश तिलकचंद बडोले, अस्मिता तिलकचंद बडोले व भुषण दिनेश बडोले (३) सर्व रा. साकोली असे जखमींची नावे आहेत.
सविस्तर असे की, दिनेश तिलकचंद बडोले हे पत्नी व मुलासोबत दुचाकीने गोरेगाव कडून साकोलीकडे जात होते. जानाटोला पेट्रोल पंप जवळ रस्ता ओलांडणारी रानडुक्कर भरधाव मोटारसायकलवर आदळली. यामुळे तिन्ही मोटारसायकल स्वार रस्त्याच्या खाली पडून जखमी झाले. विशेष म्हणजे दिनेश बोडेल व अस्मिता बडोले हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर तीन वर्षिय भूषण बडोले हा किरकोळ जखमी झाला आहे. तिन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उल्लेखनीय असे की, या अपघातात रानडुक्करचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव वन विभागान ेघटनास्थळ गाठून मृत रानडुक्करला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद गोरेगाव पोलिसात करण्यात आली आहे.




