Home गोंदिया जिल्हा गांजा तस्करी करणारे दोघे जाळ्यात अडकले

गांजा तस्करी करणारे दोघे जाळ्यात अडकले

100
0

१.३० लाखाचा मुद्देमाल जप्त, देवरी पोलिसांची कारवाई
देवरी :
गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या नाकाबंदीच्या जाळ्यात गांजा तस्करी करणारा आरोपी जाळ्यात अडकला. या कारवाई अंतर्गत १५ हजार रुपया किंमतीचा गांजासह १ लाख ३० हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
देवरी पोलिसांना २ व्यक्ती दुचाकीने अवैधरित्या गांजाची वाहतूक करीत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. या मातीच्या आधारावर आमगाव मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान दुचाकी क्र. पी.एस.१०/ईजी.५१७६ ने प्रवास करणार्‍या इसमास थांबविण्यात आले. त्याची झाडाझडती केली असता, त्याच्याकडे असलेल्या बॅगमधील पॉलीथिनमध्ये १ किलो गांजा सापडला. सदर गांजा १५ हजार रुपया किंमतीचा होता. यावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आला. १ लाख रुपया किंमतीची मोटारसायकल, वजन काटा, बॅग, मोबाईल संच, व दुसर्‍या आरोपीकडून मोबाईल संच असा एकूण १ लाख ३० हजार ७०० रुपया किंमतीचा मुद्देमाल राजपत्रित अधिकारी व इतर पंचासमक्ष जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून देवरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अधिनियमांतर्गत कलम ८ क, २० (ब) (२) (क), २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. अंजोरी गंगाकचुर करीत आहेत.