■ एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव/ बाजार येथील परीक्षा केंद्रावर परिक्षा पार पडली.

देवरी,ता.०१: नेस्ट व स्टेट सोसायटी मार्फत रविवार रोजी एकलव्य प्रवेश पूर्व परीक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव/ बाजार तालुका देवरी या परीक्षा केंद्रावर पार पडली.
या परीक्षे दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेद काशीद, सहाय्यक. प्रकल्प अधिकारी शिरीष सोनवणे, एस. टी. भुसारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र पाळेकर यांनी परीक्षा केंद्रास भेट दिली.
सदर परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. इयत्ता ६ वि ची ११ ते ०१ वाजे या वेळेत तर ७ ते ९ वि ची ०२ ते ०५ वाजता या वेळेत पार पडली. दोन्ही सत्रात मिळून एकूण ४९५ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. परीक्षार्थीसाठी जेवणाची सोय परीक्षा केन्द्रावर करण्यात आली होती.
सदर परीक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव बाजार या शाळेचे प्राचार्य गणेशकुमार तोडकर यांच्या देखरेख मध्ये पार पडली.#
(टिप:- या बातमी सोबत बोरगाव/बाजार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल च्या एकलव्य प्रवेश पूर्व परीक्षा केन्द्राला भेट देवून पाहणी करतांनी देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेद काशीद, सहाय्यक. प्रकल्प अधिकारी शिरीष सोनवणे एस. टी. भुसारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र पाळेकर व प्राचार्य गणेशकुमार तोडकर यांची फोटो पाठविली आहे.)
