अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तालुक्यातील पिंपळगाव /खांबी येथील रजनीश विजय शिवणकर या दहा वर्षीय बालकाचा 21 जुलै रोजी मुरमाच्या खाणीत बुडून मृत्यू झाला होता. ही माहिती प्राप्त होताच माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी 25 जुलै रोजी पिंपळगाव येथे मृत बालकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. रविवार, 21 जुलै रोजी पिंपळगाव /खांबी येथील दहा वर्षाचा मुलगा खाणीत बुडून मरण पावला होता. मृतकाचे आई-वडील भूमीहीन असुन कमावून खाणारे गरीब लोक आहेत. अशात त्यांचा मुलगा मरण पावल्याने शिवणकर परिवारावर दुःखाचा पहाड कोसळला, यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मृतकाचे घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करुन मदत सुद्धा केली. या गरीब कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल याविषयी त्यांनी तहसीलदार व कृषी विभागाच्या तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. तसेच मृत विद्यार्थी ज्या शाळेत शिकत होता त्या मुख्याध्यापकाशी चर्चा करून राजीव गांधी सानुग्रह योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. मृतकाचे आईचे नाव सातबारावर असल्याने गोपीनाथ मुंडे अपघाती योजनेतून लाभ मिळवून देता येईल का याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली. यावेळी माजी मंत्री बडोले सोबत भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, मृत्तकाचे आई-वडील, सरपंच विलास फुंडे,उपसरपंच निवृत्ताताई शेंडे, प्राणगोपाल दास,जयवंत डोये, गौरीशंकर ब्राम्हणकर, मुन्ना उके,अविनाश उके,मोरेश्वर मेंढे,आशिष बिसेन,दामु सुर्यवंशी, जगदीश डोंगरे, युवराज डोंगरे, खोजराम ब्राम्हणकर, गणदेव सुखदेवे, हेमराज तरोणे, हेमराज फुंडे, रविंद्र भेंडारकर, पुरुषोत्तम ब्राम्हणकर, कैलास शेंडे,व ग्रामवासी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

