Home Uncategorized इटियाडोह धरणाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन

इटियाडोह धरणाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन

70
0

इटियाडोह सांडव्यावरुन 9 इंच पाण्याचा विसर्ग सुरु

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे 24 जुलै रोजी 100 टक्के भरले असून ओव्हरफ्लो होत धरणाच्या सांडव्यावरुन 9 इंच पाण्याचा विसर्ग सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी इटियाडोह धरणाला भेट देवून जलपूजन केले. या परिसरात लागवडी खालील क्षेत्रापैकी सुमारे 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते.2024 यावर्षी च्या जुलै महिन्यात 19 जुलै ते 24 जुलै दरम्यान झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली. यामुळे खरीप हंगामात पूर परिस्थिती दिसून आली. खरीप हंगामातील शेवटचे सत्र सुरू असून मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी आलेल्या दमदार मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, मोठे धरण, मोठे धरण, जलयुक्त शिवार योजनेतील तलाव, बोडी, मामा तलाव आदींमध्ये जवळपास 100 टक्के जलसाठा झाला. इटियाडोह धरण हे 100 टक्के भरताच 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह इटीयाडोह धरणाचे शासकीय जलपुजन केले. तसेच गाढवी नदीच्या काठावरील गावांना आणि नदीपात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व सबंधितांनी काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. यावेळी जलपुजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे सोबत अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, अर्जुनी/मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेेकार, उप कार्यकारी अभियंता शेन्डे, शाखा अभियंता सुनिल राऊत, केतन गिऱ्हेपुंजे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.