गोंदिया, दि.20 : युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सन 2025 पासून सुरु करण्यात आलेली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना खासगी संस्थामध्ये कामाचा अनुभव मिळणार असून त्यांना रोजगारक्षम बनविण्यास मदत होईल. आपल्या करिअरला नविन दिशा देण्यासाठी तरुणांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.
सदर योजनेच्या इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया 31 मार्चपर्यंत खुली आहे. नोंदणी किंवा अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी 500 कंपन्यांची यादी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होईल. इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर अर्ज करु शकतात. उमेदवार https://youtube/TSO9DXtnTAs?si=UKrYKR8D-ZT9iNkP या संकेतस्थळाचा वापर अर्ज करण्यासाठी करु शकतात. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, बारावी पास, आयटीआय प्रमाणपत्र धारक, पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक, पदवी धारक यापैकी कोणतीही पात्रता पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
योजनेसाठी पात्रता निकष : अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे वय 21 ते 24 वर्षे (अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार) असावे. अर्जदार पुर्णवेळ नोकरीत किंवा नियमित शिक्षण घेत नसावा, मात्र ऑनलाईन किंवा दुरशिक्षणाद्वारे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करु शकतात.
