अर्जुनी मोर. :यावर्षी खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल अजुनपर्यंत करण्यात आली नाही.त्यामुळे तालुक्यातील गोदाम धानाने फुल्ल भरलेली आहेत.राईस मिल असोसिएशन नी आपल्या काही अडचणीमुळे खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेले धान भरडाई साठी उचलेले नाही.त्यामुळे उन्हाळी हंगामातील धानाची खरेदी ची प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने त्वरीत पावले उचलुन खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेले धान त्वरीत उचलुन रब्बी धानाची खरेदी त्वरीत सुरु करावी अशी मागणी भाजपा चे तालुका अध्यक्ष तथा खरेदी विक्री समीतीचे उपसभापती विजय कापगते यांनी केली आहे. तसेच रब्बी हंगामात अवकाळी पावसाने मका व धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त शेतीचे त्वरीत पंचनामे करून आर्थीक मदत देण्याची मागणीही विजय कापगते यांनी केली आहे.
अर्जुनी मोर. तालुका हा धान पिकासाठी प्रख्यात आहे. खरीप हंगामासह रब्बी हंगामात सुद्धा मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. अर्जुनी मोर. तालुक्यात गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातुन तालुक्यातील दि.तालुका शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर.ही सब एजन्ठ म्हणुन धान खरेदी करते.तर तालुक्यात आदिवासी महामंडळाच्या माध्यमातुन सुध्दा शासनाच्या आधारभूत हमी भाव अंतर्गत धान खरेदी केल्या जाते.आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी खरीप पिकांचे लाखो क्विंटल धान खरेदी केले असुन अजुनही धानाची उचल न झाल्याने लाखो क्विंटल धान आजही उघड्यावर पडुन आहे.त्यांनाही रब्बी हंगामातील धानाची खरेदी कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यात खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर. ही मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करणारी एकमेव सबएजंन्ठ संस्था आहे. या संस्थेनी यावर्षीच्या खरीप हंगामात खरेदी केलेले ३ हजार ४४६ शेतक-यांचे १ लाख १४ हजार ४३८.८० क्विंटल धान भरडाईसाठी उचल न झाल्यामुळे तालुक्यातील २६ गोदामांमधे पडुन आहे.त्यामुळे रब्बी हंगामातील धानाची खरेदी कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेले धानाची उचल करुन रब्बी धानाची खरेदी त्वरीत सुरु करण्याची मागणी विजय कापगते यांनी केली आहे.
नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून आर्थीक मदत द्या
सध्या तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असुन मका व धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी नुकसान ग्रस्त शेतीचे त्वरीत पंचनामे करून शेतक-यांना आर्थीक मदत देण्याची मागणीही विजय कापगते यांनी केली आहे.

