गोंदिया :सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखाली येणाºया रुग्णालयंमध्ये पॅथॉलाजीच्या चाचण्यांपासून ते एक्स-रे, सीटीस्कॅन, एमआरआय, रुगणवाहीका व सफाईच्या कामांचे खसगीकरण झाले आहे. आत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) धर्तीवर राज्यभरातील ३६७ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात १ हजार ९५० बेडचे डायलिसीस केंद्र उभारले जात आहे. या संदर्भात नुकतेच एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कडून रुग्णालयाची पाहणी करण्यात आली.
दोन्ही मुत्रिंपड कायमस्वरुपी किंवा तात्पुरत्या स्वरुपात निकामी झालेल्या रुग्णाला डायलिसीस करण्याशिवाय पर्याय नसतो. यातील अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस हिमोडायलिसीस करावे लागते. महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून लाभार्थी रुग्णांना शहर व ग्रामीण भागातील शासकीयसहीत काही निवडक खासगी केंद्रावर ही सोय उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयांना अधिक सक्षम करण्याऐवजी सार्वजनिक आरोग्य विभागाने गोंदिया सह भंडारा,वर्धा, चंद्रपुर,गडचिरोली, अमरावती, नंदुरबार, पालघर, रायगड, नाशिक, धुळे,अहमदनगर, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, पुणे, सोलापुर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, जळगाव, जालना, नांदेड, सातारा व वाशिम येथील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात पीपीपी धर्तीवर डायलिसीस केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.




