Home गोंदिया जिल्हा जयस्तंभ चौकात शिस्तीला ‘रामराम’

जयस्तंभ चौकात शिस्तीला ‘रामराम’

76
0

गोंदिया : जयस्तंभ चौक शहरातील अत्यंत महत्त्वाचा, वर्दळीचा चौक. तरीही कसलीही शिस्त नसलेला चौक. या चौकात वाहनांचा वेग आपोआपच वाढतो, कमी होतो आणि नियमही धाब्यावर बसतात. शॉर्टकट तर या चौकाची विशेषताच म्हणावी लागेल. एकूणच वाहन चालकांची कृती शिस्तीला ‘रामराम’ करणारी असल्याचे येथे पहावयास मिळते.
आमगाव, सालेकसा, कोहमारा, अर्जुनी मोरगाव, साकोली, भंडारा, नागपूर जाणाºया वाहतुकीला ज्या चौकातून सुरुवात होते, तो जयस्तंभ चौक. तसेच शहरातील बस, रेल्वेस्थानक, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, मुख्य बाजारपेठ, बालाघाट, तिरोडा येथे जाणारी वाहने व नागरिकांची मोठी गर्दी या चौकात राहते. चौकातील वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल लावण्यात आले आहेत. चौकाला लागून पेट्रोल पंप आहे. पलीकडे प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, प्रवासी वाहतूक थांबा, जिल्हा न्यायालय, वस्तू व सेवा कार्यालय व विशेष म्हणजे इथूनच हाकेच्या अंतरावर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय आहे, असे असताना या चौकातील वाहतूक कधीही नियंत्रित राहत नाही. वाहतुकीच्या नियंत्रणासाठी येथे काही दिवसापूर्वी ट्राफिक बूथ बसविण्यात आले. कर्तव्यावरील कर्मचाºयाने येथे कर्तव्य बजावणे गरजेचे असताना ते इतरत्र दिसून येतात. पंचायत समिती कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर वाहनांच्या रांगा पहावयास मिळतात. या कार्यालयासमोरील जागा पार्किंगसाठीच आंदण दिली आहे. नाहीतर नो पार्किंगच्या बोर्डला चिकटून गाड्या लावण्याचं धाडस झालं नसतं. सारं पार्किंग रस्त्यावर, त्यावर कुणाचाही वचक नाही. पेट्रोलपंप, गणेशनगर, उड्डाण पुल, मुख्य बाजारपेठ व मनोहर चौकाकडून येणारे वाहनचालक ट्राफिक नियम न पडताच शॉर्टकट घेतात. त्यामुळे येथे अपघात नित्याचे झाले आहेत.