Home गोंदिया जिल्हा इअरटॅगिंग शिवाय ना खरेदी, ना विक्री

इअरटॅगिंग शिवाय ना खरेदी, ना विक्री

60
0

गोंदिया : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन (एनडीआयएम) अंतर्गत भारत पशुधनप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रणालीमध्ये १२ अंकी बार कोड नंबर असलेल्या बार टॅगिंग माध्यमातून जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राज्यातील सर्व पशुधनाला आता इअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. इअर टॅगिंग म्हणजेच जनावरांचे आधार कार्य समजले जाते थर रॅगिंग तसे पूवीर्पासूनच केले जात होते. परंतु, प्रशपालक यासाठी फारसे सकारात्मक नव्हते. इअर टॅगिंग नसेल, तर १ जूननंतर कोणत्याही जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही. पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजना, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी इअर टॅगिंग आवश्यक राहणार आहे. शिवाय, या नोंदणीमुळे जनावरांना होणाºया विविध आजारांची आगाऊ माहिती मिळाल्याने अन्य परिसरात प्रतिबंधात्मक उपाय राबवून पशुधनाची जीवितहानी टाळता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकास नुकसानभरपाई मिळण्यासाठी टॅगिंग आवश्यक आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जूननंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री किंवा पशुपालकांना सुविधा मिळणार नाहीत.