Home Uncategorized माजी मंत्री बडोले यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशी विविध विषयांवर चर्चा

माजी मंत्री बडोले यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशी विविध विषयांवर चर्चा

67
0

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते राजकुमार बडोले यांनी 18 जुलै रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणी जलवायु परिवर्तन मंत्री तसेच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सवीस्तर चर्चा करण्यात आली. पर्यावरण हा आपल्या गोंदिया जिल्ह्य़ातील महत्वाचा विषय असुन यांमध्ये विकासकामात येत असलेले अडथडे निकाली कसे काढता येतील. यावर चर्चा करुन येणारे दिवस हे निवडणुकांचे असुन त्यादृष्टीने पक्षाचे संघटन मजबुत करण्याचे दृष्टीनेही सकारात्मक चर्चा करण्यात आली. माजी मंत्री राजकुमार बडोले हे गोंदिया जिल्ह्य़ातील भाजपाचे पाॅवरफुल नेते असुन पक्ष संघटन यावर ते विशेष काम करीत असल्याने राज्यातील अनेक भाजपाच्या जेष्ठ नेत्यांसह दिल्ली पर्यंतच्या वरिष्ठ नेते मंडळी सोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने अनेक प्रकारची कामे करण्यास माजी मंत्री बडोले यांना सोयीचे होत असते ते या भेटीवरुन सिध्द होत आहे.