अर्जुनी मोर. : तालुका हा जंगलव्याप्त आहे. शेतजमीन आणि जंगल जवळपास लागुनच असल्याने शेतकरी व नागरीकांना जंगली जनावरांचे दर्शन नित्याचीच बाब झाली आहे. तालुक्यातील इंजोरी, बोरटोला, मळेघाट या जंगल परिसरात मोठ्या संख्येने जंगली जनावरांचे वात्सव्य आहे.दि.१९ मार्च ला शेतक-यांना अस्वलीचे दर्शन झाले असुन सदर अस्वलीने लोकांना दिमाखदार पोज दिली असुन अनेकांनी आपल्या मोबाईल मधे शूटिंग करुन अस्वलाचा फोटो शुट करण्याचा मोह आवरता आला नाही.

अर्जुनी मोर. तालुका हा नवेगावबांध, नागझिरा अभयारण्य मधे मोडतो तर काही भाग प्रादेशिक वनविभागामधे येतो.निसर्ग वनराईने नटलेला हा परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. शिकारीचे प्रमाण अजीबातच नसल्याने व नवेगावबांध, नागझिरा अभयारण्य असल्याने जंगली जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जल,जमीन,जंगलाने परिपूर्ण असलेल्या या तालुक्यात बोरटोला, इंजोरी, मळेघाट हा पहाडी परिसर असुन घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.या जंगल परिसरात बिबट,अस्वल,रानडुकर,सांबर, चित्तर,निलगाय, हरीण, व अन्य जनावर मोठ्या प्रमाणात आहेत.तर दररोज सकाळी सात ते नऊ च्या दरम्यान मोरांचे थवे चे थवे इंजोरी, बोरटोला मार्गावरील पहाडी जंगल परिसरात स्वैराचार करतांनी आढळून येतात.असी माहीती इंजोरी-बोरटोला गटग्रामपंचायतचे सदस्या दिपंकर उके यांनी दिली.या जंगल परीसराला लागुनच शेतशिवार असल्याने शेतक-यांना दररोजच वन्यप्राण्यांचे दर्शन होत असते.या वन्यप्राण्यांनी जिवीतहानी केली नसली तरी शेतक-यांवर रुबाब करतात.व काही जनावरे पाठलाग सुध्दा करतात.त्यामुळे काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडत असतात. दि.१९ मार्च ला अशाच एका अस्वलाचे दर्शन झाले असुन या अस्वलाने दिमाखदार पोझ दिल्याचे सांगण्यात आले. वनविगाभाच्या वन्यजीव विभागाने या परिसरात गस्त घालुन जंगली जनावरांचे व मानवांचे संरक्षण करण्यासंदर्भात पावले उचलावी असी विनंती ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दिपंकर उके यांनी केली आहे.




